Monday, 9 November 2015

Think Practically, Don't be stupid..

आज मनातल्या भावना कागदावर उत्रवाव्या, असं वाटतंय..
खूप काही आहे जे मना मध्ये साचलंय, ते सांगावसं वाटतंय..
वाटतंय म्हणून लिहित आहे, ते वाचायला कोणीतरी हवं..
सांगायला सुद्धा तयार आहे मी, अहो पण कोणी ऐकणारं तरी हवं..

नाती जपण्या साठी आपुलकी गरजेची आहे, पैसे नाही ..
पैसे पाहून लोक तुमच्या सोबत राहत असतील, तर ते खरे नाते नाही..
अशी नाती जपण्या पेक्षा सरळ वेगळे व्हा...
जमायचं नाही काहींना, त्यांनी जरा "PRACTICAL" व्हा..

प्रश्न तर पडला असेलच "PRACTICAL" व्हायचा म्हणजे नक्की काय करायचं?
जास्तं विचार करू नका, सोप्पं आहे, माणसा कडे न पाहता त्याच्या पैश्या कडे पहायचं..
तो कसा वागतो ह्या पेक्षा तो कोणत्या ब्रांड चे कपडे वापरतो, ते बघायचं..
माणुसकी काय गटारात पडल्या सारखी कुठे ही मिळेल पण त्याच्या कडे कार कोणती ते आधी बघायचं..

अजूनही उत्तर मिळाला नसेल तर एकच करायचं..
आपल्या कामा पुरतं कोणाला तरी बकरा बनवायचं..
काम असे पर्यंत किव्हा टाइम पास होतोय तोपर्यंत समोरच्या व्यक्ती ला गोंजारत बसायचं..
आणि हेतू साद्ध्य झाला कि अलगत चाकू फिरवून गळा चिरून मारून टाकायचं..

ऎकून विचित्र वाटेल, पण आजच्या जगात मान वर करून वावरण्यासाठी हे गरजेचा आहे..
तुम्ही कर्तुत्वाने कोणीही व्हा पण जर पैसा असेल तरच तुम्हाला महत्व आहे..
जे "PRACTICAL" विचार करतात तेच आयुष्य सुखाने जगू शकतात..
जे हा विचार करू शकत नाहीत ते माझ्या सारखे आयुष्यभर फालतू काहीतरी लिहित बसतात..


निखील कुंभार
(Dedicated to all the practical thinkers who were / are part of my life)